धावत्या रेल्वेतून पडून आईसह बाळाचा मृत्यू

-मृतक नागपुरातील रहिवासी
-लष्करातील शिक्षक कुटुंबासह निघाले होते रिवासाठी
-इतवारी रीवा एक्सप्रेसमधील घटना
नागपूर – धावत्या रेल्वेतून पडून आई आणि बाळाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास तिरोडा आणि तुमसर दरम्यान घडली. पुजा रामटेके (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर मृतक बाळ केवळ १४ महिण्यांचा आहे. इतवारी रीवा एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ही घटना घडली. रामटेके कुटुंब नागपूरचे असून आवळेनगर, कामठी मार्ग येथील रहिवासी आहे.
कामठी मार्ग निवासी ईशान रामटेके (३०) हे लष्करात शिक्षक आहेत. त्यांची पत्नी पुजा ही गृहीणी आहे. त्यांना १४ महिण्याचा बाळ आहे. ते रिवा येथील लष्करात शिक्षक या पदावर नोकरीला आहेत. रविवार २ जानेवारी रोजी ईशान पत्नी आणि बाळासह रिवाला जाण्यासाठी निघाले. इतवारी रेल्वे स्थानकाहून ही गाडी सायंकाळी ६.३० वाजता सुटली. तिघेही थ्री टिअर एसीमधून प्रवास करीत होते. इतवारीहून गाडी सुटल्याच्या दिड ते दोन तासानंतरच पत्नी आणि बाळ दिसत नव्हते. त्यांनी संपूर्ण गाडीत शोध घेतला. अखेर गोंदिया रेल्वे स्थानकावर उतरले आणि लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. त्यांनी सारा प्रकार पोलिसांना सांगितला.
त्यांचे बयान पोलिस नोंद करीत असतानाच आरपीएफच्या पथकाला एका महिलेचे शव मिळाले. ही माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. त्यावेळी इशान होताच, त्याला पार्थिवाचे फोटो दाखविण्यात आले तसेच घटनास्थळी पार्थिवाची ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले. मृत महिला पुजा रामटेके अशी ओळख पटली. पुजाचे शव वैनगंगा नदीच्या पुलावर लोखंडी अँगलमध्ये अडकले होते. तर काही दुर अंतरावर नदीच्या पात्रात मुलाचे शव मिळाले. दोन्ही शवाची ओळख पटली. लोहमार्ग पोलिसांची हद्द नसल्याने हे प्रकरण करडी पोलिसांकडे सोपविण्यात आले. या प्रकरणी करडी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.

लोहमार्ग पोलिसांनी नोंदविले बयान
पुजाचे पती फिर्यादी इशान रामटेके यांनी पोलिसांना दिलेल्या बयानानुसार तिघेही एकाच डब्यात होते. दरम्यान बाळाला भुक लागली, पुजाने त्याला खायला दिले. त्याचे हात तोंड धुण्यासाठी बाळाला घेवून ती वॉश बेसिनकडे निघाली. १० ते १५ मिनीट होवूनही ती परतली नाही. त्यामुळे इशान घाबरला आणि वॉश बेसिकडे निघाला. मात्र, पुजा नव्हती. त्याने गाडीत सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

काटोल तहसील के 15से18आयुवर्ग के616छात्रो  का टीकाकरण

Mon Jan 3 , 2022
काटोल-संवाददाता -काटोल  तहसील के   प्राथमिक स्वास्थ केंद्र कोंढाली,  येनवा, कचारीसावंगा  के साथ साथ  ग्रामिण अस्पताल  काटोल के तहत  03जनवरी को  15से 18आयुवर्ग  के616छात्रों  ने   कोविड19 रोधक टीके के पहली खुराग का लाभ  लिया । आरोग्य  विभाग के  काटोल तहसील  आरोग्य अधिकारी  डाक्टर शशांक व्यव्हारे ने  बताया की  केंद्र तथा राज्य  सरकार  के निर्देशानुसार 15से18आयुवर्ग  के  छात्रों  को03जनवरी  से टीकाकरण  का  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com