बेला :- येथील बसस्थानकामागे महावितरण चे दोन रोहित्र आहे.तेथे मोठ्या प्रमाणात केर, कचरा,झाडे झुडपे व घाण, दुर्गंधी असताना वीज वितरण कंपनीचे लाईनमेन कशी दुरुस्ती करत असेल ? हे एक कोडे आहे. पावसाळ्यात वेलांनी रोहित्र झाकून गेले होते.
याबाबत,बातमी येताच एका डीपीवरचा कचरा साफ झाला. मात्र, दुसरे रोहित्र जैसे थे आहे. रोहीत्राच्या पेट्या उघड्या आहेत. पेटी समोरच महिला प्रसाधनगृह आहे. त्यामुळे महिलांना ये जा करताना उघड्या डीपीतून धोका होऊ शकतो. मात्र याचे सोयरसुतक महावितरण व स्थानिक प्रशासनाला दिसून येत नाही.