संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना रोड वरील ओव्हरब्रिज च्या पुढे कळमना कडे जात असलेल्या इसमास रस्त्याच्या कडेला झाडाजवळ दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीने येऊन सदर इसमास थांबवून बळजबरीने त्याच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा एक महागडा मोबाईल व 1 लक्ष 35 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण 1 लक्ष 45 हजार रूपयाचा मुद्देमाल लुबाडून पळ काढण्याची घटना गतरात्री 11 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी प्रितेश नागोसे वय 38 वर्षे रा कळमना नागपूर ने कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्धकायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.