मध्य रेल्वेच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा

नागपूर :-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी एक दिवसीय नागपूर दौर्‍यावर आले असता पुनर्विकास प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेतला.

नागपूरला पोहोचल्यावर त्यांनी त्यांनी बडनेरा – नागपूर विभागाचे विंडो ट्रेलिंग निरीक्षण केले. अजनी रेल्वे स्थानकाची पाहणी करून पुनर्विकास प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अजनी येथील बीओटी तत्वावरील लॉन्ड्रीची पाहणी केली. अजनी क्रिकेट मैदानावरील वृक्षारोपणातही त्यांनी सहभागी घेतला.

नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात महाव्यवस्थापकांना वर्धा स्थानक पुनर्विकास आणि अमृत भारत स्थानकाबाबतचे सादरीकरण मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांनी केले.

रेल्वे संघटनांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली. नागपूर रेल्वे स्थानक आणि लॉबीची पाहणी केली. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरव प्रसाद, मध्य रेल्वेचे प्रधान विभागप्रमुख आणि नागपूर विभागातील शाखा अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी, सांताक्रुझ येथील विकास रात्र विद्यालयाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट

Wed Mar 8 , 2023
मुंबई :-प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गदत्त काही ना काही प्रतिभा असते. या प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो असे सांगून रात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाही व्यवसायासाठी तरी ज्ञानवर्धनासाठी तरी शिकावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी (दि. ६) मुंबईतील सांताक्रुझ येथील उपनगर शिक्षण मंडळातर्फे संचालित विकास रात्र विद्यालयाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com