– दक्षिण पश्चिम मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढविण्याची तुषार गिऱ्हे यांची पूर्ण तयारी – मनसे
नागपुर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जाहीर केल्यानंतर नागपूर शहरातील सहा ही विधानसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार निवडून पक्षश्रेष्ठी समोर ठेवण्यासाठी पक्षाचे नेते दोन निरीक्षक नागपुरात पाठवले आहे व त्यांनी गुरुवारी रवीभवन येथे बैठकीत उर्वरित सहा जागांचा आढावा घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहरातील दक्षिण पश्चिम, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य व पूर्व मतदार संघातील बैठक १ ऑगष्ट रोजी रविभवन येथे गुरुवारी संपन्न झाली. बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते व अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे, मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष गौरव वावलकर, मनसे अभियंता, कंत्राटदार संघटनेचे कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य सेल व इतर सर्व अधिकृत सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत भेटी घेत चर्चाही झाल्या व केलेल्या कामांची रूपरेषा जाणून घेतली.गुरुवारी उर्वरित सहा जागांचा आढावा घेत माहिती दिली.
त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा २०२४ निवडणुकीबाबत उभे राहण्यात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नावे मागितली असता कोणतेच नाव समोर आले नसल्यामुळे नागपूर उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी उभे राहण्याची व लढण्याची इच्छा व्यक्त केली असता सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने त्यांचे समर्थन व पाठींबा जाहीर केला.
सध्या दक्षिण पश्चिम मतदार संघात त्यांनी केलेल्या कामांचा बोलबाला असल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. निवडणूक लढविण्यासंबंधी तुषार गिऱ्हे यांची पूर्ण तयारी असल्याचे दिसून येत आहे. नागपूरचे शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे, शहर सचिव श्याम पुनियानी यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी तुषार गिऱ्हे यांना पूर्ण समर्थन असल्याची माहिती दिली व तुषार गिऱ्हे यांना निवडणूक लढविण्याकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.