कन्हान : – सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाचा सदु पयोग करावा. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये व सामाजिक सहभाग वाढवुन आपले उर्वरित आयुष्य सुखाने जगावे असे आवाहन वे.को.लि.कामठी इंदर उपश्रेत्रिय प्रबंधक मा. दीक्षित यांनी सेवानिवृत्त झाले ल्या कर्मचाऱ्यांना निरोप समारंभात ते अध्यक्ष स्थाना वरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन उपक्षेतिय अभियंता विजय कुंडूकवार उपस्थित होते.
कांद्रीयेथील मातोश्री सभागृहात आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेले उपश्रेत्रिय अभियंता दिपक दुबे, फोरमन राजेश सिंग, फोरमन कलिम अहमद, फोरमन सोमा वासनिक, प्रभाकर मंदे, मनिष त्रिलोक, जगन बोबडे, वसंता केकतपूरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अभियंता प्रदीप कुमार, कालिदास कुळकर्णी, यशवंत निर्वाण, रमेश गोळघाटे, महेंद्र पुरोहित, आसिफ खान, साबिर सिद्दी की, राजेश अंबादे, श्याम बावनकुळे, धर्मराज संतापे, भरत काथ्यानी, सुधाकर तलमले, शैलेश क्षीरसागर, अरूण कावळे, मनोज झोडे, जितेंद्र प्रसाद, दुलार सिंग , अब्बास अली, मधुकर गोंडाणे, राजेंद्र चिमुरकर, ब्रिज मोहन बनवारी, सोहिल कैलास, सुरेश धकाते, नरेश साखरकर, किशोर पोटभरे, देवाजी घुगल, शैलेश पाल, प्रशांत हटवार, शुभम तुळणकर, सुनील नाकतोडे, पुजा पांडे, देवकी बाई, राकेश वानखेडे, अनिल प्रसाद, कवडु प्रसाद पाटील, राजेश पाली, भगवान, सुनील कनोजिया, अवधेश सिंग, पांडुरंग हुड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता संदीप बोरीकर, उमा शंकर रायपुरकर, रविंद्र पाटील सह वेकोलि कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.