नागपूर :- नेहरूनगर झोनमधील प्रभाग क्र. २६ अंतर्गत वाठोडा दहन घाटाची दयनीय अवस्था असून या दहन घाटाचे नूतनीकरण करा, अशी मागणी मनपाचे माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना केली आहे. वारंवार निवेदन देउन देखील वाठोडा दहन घाटाची स्थिती न सुधारल्याने कुकडे यांनी दहन घाटाचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे. वाठोडा दहन घाटाची सद्यसथिती अत्यंत बिकट असून त्यात मोठया प्रमाणात आधुनिक पध्दतीने नुतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. घाटातील अत्यावश्यक ठिकाणे जसे विसावा परिसर, अग्नीसंस्कार परिसर, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ शौचालयाची सोय, घाट परिसरातील फ्लोअरींग, मंदिर परिसरातील हिरवळ, मुख्य प्रवेशद्वार, नागरिकांकरिता बसण्याची सोय आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील इतर आधुनिक दहन घाटांप्रमाणे वाठोडा दहनघाटचे सौंदर्यीकरण करणे आणि इतर आवश्यक कामे करण्याची मागणी माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्याद्वारे करण्यात आली आहे.
वाठोडा दहन घाटाचे नूतनीकरण करा माजी परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com