संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी मुलींना बारावीनंतर 642 अभ्यासक्रमामधील उच्च शिक्षण पूर्णता मोफत दिले जाईल तसेच या शिक्षणासाठी एक पैसाही लागणार नाही आदी घोषणा केल्या होत्या.प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या नंतर यावर्षी अद्यापपर्यंत शासन निर्णय न निघाल्याने विद्यार्थिनीमध्ये संभ्रमावस्था आहे .यासंदर्भात त्वरित शासन निर्णय काढून मुलींच्या मोफत शिक्षणाचा मार्ग सुकर करावा अन्यथा कांग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिला आहे.
मुलींना बारावीनंतर मोफत शिक्षण मिळणार या घोषणेने लाखो मुलीना बारावी नंतरच्या कला,विज्ञान,पदवी तसेच वैद्यकिय ,अभियांत्रिकी शिक्षण, कायदा,बी एड, फार्मसी,शेती, व्यवस्थापकीय कोर्सेस व खासगी प्रोफेशनल अश्या 642 कोर्सेससाठी फायदा होईल असे अपेक्षीत होते मात्र याबाबतचा शासन निर्णय न निघाल्याने सर्वांचा हिरमोड होत आहे. जी आर काढताना डेव्हलपमेंट आणि इतर सर्व प्रकारचे शुल्क माफ केले तरच मुलींना मोफत शिक्षण घेता येईल.शासकीय महाविद्यालयाच्या शुल्क रचनेचा विचार केल्यास शिकवणी शुल्क फक्त 15 टक्के असते आणि इतर शुल्क 85 टक्के असते .शासनाने शासन निर्णयात फक्त ट्युशन शुल्क नव्हे तर संपूर्ण शुल्क माफ करून मोफत शिक्षणाचा परिपूर्ण शासन निर्णय जारी केला तरच त्याचा लाभ होऊ शकतो.