समाज कल्याण विभागाच्या यशोगाथांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विमोचन

नागपूर :- समाज कल्याण विभागामार्फत लाभकारी योजना राबविण्यात येतात. उत्कृष्टपणे राबविण्यात आलेल्या योजनांच्या यशोगाथाची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पुस्तक स्वरुपात तयार करण्यात आलेली असून या यशोगाथा पुस्तिकेचे विमोचन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते महाराष्ट्रदिनी करण्यात आले.

या प्रसंगी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, , समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ, गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, श्री. उपायुक्त सुरेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे, भंडारा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाज कल्याण विभागातील सर्व जिल्ह्यांच्या' यशोगाथांचे समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते विमोचन

Tue May 2 , 2023
नागपूर :- आज महाराष्ट्र राज्यासाठी सोनेरी दिवस आहे. ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी आहुती दिली. त्यांना आज श्रद्धांजली वाहिली पाहिजे. त्यांनी जर लढा दिला नसता तर आज महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली नसती. महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता आपली आहे. आपले राष्ट्र पुढे घेऊन जायचे असेल तर विचारांनी सक्षम व्हावे लागेल, असे प्रतिपादन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com