गडचिरोली : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात गडचिरोली प्रकाल्पांतर्गत कार्यान्वीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल मधील इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी चे तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11.00 ते 13.00 या वेळात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,गडचिरोली/ शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,सोनसरी या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सन 2022-23 शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 वी चे वर्गात शिकत असलेले परंतू ज्या पालकांचे वार्षीक उत्पन्न रुपये 6 लक्ष पेक्षा कमी आहे. अशाच पालकांचे अनुसूचित / आदिम जमातीचे पाल्य (विद्यार्थी) हे सदर स्पर्धा परिक्षेस बसण्यास पात्र राहतील. परीक्षेबाबतचे प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय,तसेच नजिकच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2023 राहील.
या प्रकल्पांतर्गत कार्यान्वीत एकलव्य निवासी शाळा पुढील प्रमाणे – चामोर्शी, (सध्या कार्यरत ठिकाण) शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली, 6 वीते 9 वी गेवर्धा,(सध्या कार्यरत ठिकाण) शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली, 6 वी ते 9 वी कोरची, शासकीय माध्यमीक आश्रमशाळा,कोरची, 6 वी ते 8 वी,धानोरा, (सध्या कार्यरत ठिकाण) शासकीय माध्यमीक आश्रमशाळा, सावरगाव, 6 वी ते 7, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी,(प्रशासन) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली, चंदा मगर यांनी कळविले आहे.
@ फाईल फोटो