चंद्रपुर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनाबाबत 

चंद्रपूर  –  सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी  उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर शहरमहानगरपालिका कार्यालयात  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. त्याचप्रमाणे जुन महीन्यातील  लोकशाही दिन, सोमवार दि. ६ जुन २०२२ रोजी महानगरपालिका कार्यालयात आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी ०१-०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे.

अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल. संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना  लोकशाही दिनामध्ये आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या

Fri Jun 3 , 2022
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन दीड महिन्यात सात पटीने रुग्ण वाढले मुंबई : कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com