सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८३ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवार (ता.१६) रोजी उपद्रव शोध पथकाने ८३ प्रकरणांची नोंद करून ५९ हजार १०२ रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे, या अंतर्गत ४ प्रकरणाची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

तसेच हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३० प्रकरणांची नोंद करून १२००० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय कॅटरस सर्व्हिस प्रोव्हायडर आदींनी रस्तावर कचरा टाकणे या याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून २३५०० रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी कचरा, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा आशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/ टाकावू कचरा टाकणे/ साठवणे प्रथम या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १६ प्रकरणांची नोंद करून रु ३२०१ दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०५ प्रकरणांची नोंद करून रु ५००१ दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ५००० रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रवशोध पथकाने 6 प्रकरणात रु. 35000/- दंड वसुल केला. धरमपेठ झोन अंतर्गत अमर‍जित सिंह सप्रा यांच्याकडुन रु. 10000/- चा दंड वसुल केला. तसेच स्ट्रीट कॉफी, बजाज नगर यांच्या कडुन रु. 5000/-, जगदंबा फुलभंडार यांच्या कडुन रु. 5000/-, राजश्री किराणा स्टोर्स यांच्या कडुन रु. 5000/-, महाजन सोनपापडी यांच्या कडुन रु. 5000/- तसेच किचन ग्लोरी यांच्या रु. 5000/- दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्हिजन विकसित भारत@2047: तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात वेग देणारे आहात, सक्रिय व्हा, संधींचा लाभ घ्या आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा

Sat Feb 17 , 2024
– केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आयएमसी-वायएलएफ युवा परिषद 2024 मध्ये युवा वर्गाला केले संबोधित  मुंबई :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयएमसी – युवा नेते मंचाच्या (IMC-YLF) चौथ्या युवा परिषदेचे उद्घाटन केले. देश स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे अनुराग सिंग ठाकूर यांनी उद्घाटन सत्रादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com