सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 60 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (30) रोजी शोध पथकाने 60 प्रकरणांची नोंद करून 30900 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 7600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 8000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत मे. मधुर महाल होटल यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. कुंरेकर अगरबत्ती शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 2 प्रकरणांची नोंद करून रू. 10,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे विद्यार्थ्यांना "ड्रग्स विरोधी अभियान" अंतर्गत मार्गदर्शन

Wed Jul 31 , 2024
नागपूर :- पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत एडीफाय स्कूल, कामठी, नागपूर येथे ६ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मादक पदार्थामुळे शरीरावर व समाजावर होणारे दुष्परिणाम व सायबर गुन्हे तसेच भारत सरकारद्वारा लागु करण्यात आलेले नविन कायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले, तसेच वाहतुक नियमांचे महत्व समजावून सांगीतले. पोलीस आयुक्त यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!