सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या २४५ प्रकरणांची नोंद , उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, लघुशंका करणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. या अंतर्गत शुक्रवारी(२१) रोजी शोध पथकाने २४५ प्रकरणांची नोंद करून ३ लाख ४ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल केला. आतापर्यंत २,९५२ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, १४,५१,४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शहराला स्वच्छ आणि सुंदर साकारण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करीत अस्वच्छता पसरविणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या (व्यक्तीने) ७१ प्रकरणांची नोंद करून रु ७१०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सगळयांवर प्रत्येकी रु १०० प्रमाणे दंड लावण्यात आला.

तर सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यावर ३ प्रकरणांची नोंद करुन रु ६०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. याशिवाय हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) पसरविणे या अंतर्गत ३६ प्रकरणांची नोंद करून १४४०० रुपयांची वसुली केली आहे. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत १५ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. २०००/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु ४,००० दंड वसूल करण्यात आला.

वाहतुकीचा रास्ता मंडप, कमान, स्टेज रचना करून रस्त्यावर अर्थळा निर्माण करणेच्या १० प्रकरणात ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठकाणी जनावरे बंधने एका प्रकरणात १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकून परिसर अस्वच्छ करण्याऱ्या(रु. १०००/ दंड) २ प्रकरणाची नोंद करून २००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱयात टाकून, अस्वच्छता पसविल्याने, ५ प्रकरणात २ लाख १० हजार दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर ६३ व्यक्तिविरुध्द (रु.२००/ दंड) प्रकरणांची नोंद करून १२६०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून ३६ प्रकरणांमध्ये ३६,००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तसेच हरित लवाद यांनी दिलेल्या ०३.०७.२०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावरील कार्यवाहीत, १ प्रकरणात ५००० रुपये दंड आकारण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे  नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शौचालय में बैठकर यात्रा करने को मजबूर यात्री स्लीपर कोच में भी पैर रखने की जगह नहीं

Sat Oct 22 , 2022
नागपुर :- दिवाली और छठ पूजा के कारण रेलगाड़ियों में जगह नहीं मिल रही है जनरल कोच के हाल बेहाल है रेलवे द्वारा कुछ गाड़ियों को रद्द करने से दूसरी गाड़ियों में असली दरवाजे से लेकर शौचालय तक में खड़े होकर यात्रा करने को मजबूर है एक्सप्रेस गाड़ियों की स्लीपर बोगी अभी जनरल बोगी जैसे दिख रही है नागपुर स्टेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!