संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – शहरातील टेकाडी येथील रहिवासी मृतक रवि ठाकरे हया इसमाने आपल्या घराच्या मजल्यावर धान्यात ठेवायची विषारी औषध पिल्याचे समजल्याने त्यास प्रथम उपचारा करिता कामठी चौधरी रुग्णालय येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्याला न्यु ईरा रुग्णालय येथे रेफर केल्याने त्याचा उपचारा दर म्यान मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार पोलीस स्टेशन लकडगंज प्राप्त मर्ग क्र ३२७/२२ नामे रवी नामदेवरावजी ठाकरे वय ३० वर्ष रा .वार्ड क्र २ समाज भवन जवळ टेकाडी येथे राहत असुन मृतक रवि ठाकरे हा मंगळवार (दि.७ ) जुन ला सायंकाळी अंदाजे ६.३० वाजता दरम्यान घरी परत आला व आंघोळ करून वरच्या मजल्यावर गेला असता तेव्हा त्याचा घरच्या लोकांना वास आल्या ने ते वर जावुन पाहिले असता मृतक रवि ठाकरे हा खाटेवर झोपलेला होता त्याचे शर्टचे खिसे तपासले असता धान्यात ठेवायची विषारी औषध पिल्याचे सम जले त्यास प्रथम उपचार कामी चौधरी रुग्णालय कामठी येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्याला तेथुन रेफर केल्याने न्यु ईरा रुग्णालय नागपुर येथे भर्ती केले असता उपचारा दरम्यान बुधवार (दि.८) जुन ला रात्री ८ वाजता मरण पावला. त्याचा मरणात आमचा कोणत्याही प्रकारचा शक किंवा संशय नस ल्याचे ईश्वर नामदेव ठाकरे यांनी आपले बयानात सांगितले. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रमोद मोहनराव गंधे वय ३८ वर्ष राह. रमना मारोती नंदनवन नागपुर याच्या तोंडी तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्रमांक १/२२ कलम १७४ जाफौ अन्वये दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टे शन चे पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्श नात कन्हान पोलीस करीत आहे.