वॉटरपार्कमध्ये रेव्ह पार्टी, अश्लील नृत्य करताना 11 तरुणींसह 45 जणांना अटक

अमरावती :- पुणे शहरातील पब संस्कृतीची चर्चा सुरु असताना विदर्भात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेशातील एका रिसॉर्टवर पोलिसांनी कारवाई केली. रिसॉर्टवर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर मध्यरात्री अश्लील नृत्य करताना नागपुरच्या महिलांना पकडले आहे. मध्यप्रदेशच्या मूलताई पोलिसांनी वाटरपार्कमध्ये कारवाई करत 34 पुरुष आणि 11 महिलांना अटक केली आहे. अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलातील नेचर प्राईड आणि वॉटर पार्कवर ही कारवाई झाली. पोलिसांनी अटक केल्या आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुडमधील दोन जण आहेत.

पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

मुलताई पोलीस अधीक्षक निश्चल झारिया यांनी कारवाईची माहिती देताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु आहे. त्यानंतर रिसॉर्टमध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरु होता. या ठिकाणी रेव पार्टी करत अश्लिल नृत्य तरुण, तरुणी करत होते. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी नशेत असणारे युवत-युवती वॉटर पार्कमध्ये होते. अटक करण्यात आलेले बहुताश लोक महाराष्ट्रातील वरुड, नागपूर आणि अमरावती भागातील आहे.

निश्चल एन झरिया यांनी सांगितले की, रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यासाठी रिसॉर्टमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. 45 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रिसॉर्टमध्ये 11 मुली देखील होत्या. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे रिसॉर्ट महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. पोलिसांनी छापा टाकलेला रिसॉर्ट जंगलात बनवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीच्या नावाने हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये अनैतिक कारवाया होत असल्याची चर्चा यापूर्वी होत होती.

रेव्ह पार्टी म्हणजे काय?

रेव्ह पार्टीज अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करण्यात येतात. या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू, म्युझिक, नाचगाणं आणि काही वेळा सेक्सचं कॅाकटेल असते. या पार्टीत नवख्यांना प्रवेश दिला जात नाही.

Source by TV9
@ file photo

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सूर्य आग ओकू लागला, राज्यातील या शहरांचे तापमान 45 अंशांवर

Fri May 24 , 2024
मुंबई :- राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यातच राज्यातील अनेक शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या वर गेले आहे. काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडली आहे. यामुळे या शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. राज्यात जळगाव आणि अकोला शहरे सर्वाधिक हॉट शहरे ठरली आहे. या शहरांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com