पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.यांची पुण्यतिथी तर डॉ ए पी जे कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक वंजारी होते. प्रमुख अतिथी जेष्ठ प्राध्यापक मेंढे मंचावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. विश्वनाथ वंजारी यांनी संतांच्या विचारातील राष्ट्रनिर्माणाची भावना विश्वधर्माच्या पुस्तकाचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या माती जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. तर डॉ ए पी जे कलाम यांची ओळख संपूर्ण जगात ‘मिसाईल मॅन’ म्हणुन केली जाते. डॉ.कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत,असे प्रतिपादन वंजारी  यांनी केले.होते.कार्य क्रमाचे संचालन बनसोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन आशिष वरटकर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडाण अंतर्गत अतिदुर्गम भागातील विद्याथ्र्यांसाठी समर/विंटर शिबीर संपन्न

Mon Oct 16 , 2023
– समर /विंटर शिबीरामधुन विद्याथ्र्यांच्या व्यक्तीगत विकासाला चालना –  अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली गडचिरोली :-  जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल जिल्हा असून दुर्गम-अतिदुर्गम भागात शिकणा­या विद्याथ्र्यांचा शैक्षणिक, बौद्धीक विकास व्हावा, त्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मनोरंजनात्मक बाबींचा आनंद घेता यावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या विविध आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांंकरीता गडचिरोली पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com