-रामटेक च्या खेळाडूंनी पटकविला सुवर्ण पदके मिळविण्याचा मान.
रामटेक – तालुका क्रीडा संकुल सावनेर येथे आयकॉन स्केटिंग अकादमी सावनेर तर्फे घेण्यात आलेल्या दुसरी खुली विदर्भ स्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा – 2022. या स्पर्धेत R.N स्पोर्टिंग क्लब, रामटेक च्या खेळाडूंनी एकूण अकरा पदके प्राप्त केली. स्पर्धेत एकूण संपूर्ण विदर्भातील 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात R.N स्पोर्टिंग क्लब, रामटेक च्या पंधरा खेळाडूंचा सहभाग होता. यात अकरा खेळाडूंनी आपापल्या वयोगटात आठ सुवर्ण पदके, एक रौप्य पदक आणि दोन कास्य पदके प्राप्त केले. यात सुवर्ण पदक राजन्या किंमतकर, नव्या जीवतोडे, दक्षेस रॉय, आराध्या बादूले, तनिषा रॉय, अद्वैत चांदेकर, कौस्तुभ महाजन आणि स्मित मेहर यांनी तर रौप्य पदक सानिध्या पराते तर कांस्य पदक जय नारनवरे आणि यशिता झाडे आदींनी प्राप्त केले. सर्व विजयी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक सर रवींद्र नारनवरे आणि देवानंद कामठे यांना दिले आहे. तसेच काही दिवसा अगोदर नागपुर येथे झालेल्या ओपन इंविटेशनल रोलर स्केटिंग स्पर्धा-2021 मधे सुद्धा R.N स्पोर्टिंग क्लब च्या खेळाडूंनी चार पदके प्राप्त केली होती हे विशेष. त्यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.