– विजयी उमेदवारांनी रॅली काढुन केला आनंद व्यक्त
रामटेक :- कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे एकुण १८ संचालकांची समिती आहे. त्याअनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणुक प्रक्रीया दि. २८ एप्रिलला शहरातील समर्थ विद्यालय रामटेक येथे तगड्या पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली आणि ठरल्याप्रमाणे दि. २९ एप्रिलला रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला.
या निकालानुसार सेवा सहकारी मतदार संघ सर्वसाधारण गटातून सचिन मारोतराव किरपान, वीरेश श्रीराम आष्टनकर, त्रीलोकचंद बाळकृष्ण मेहर,रामू शेषराव झाडे, यशवंत सदाशिव भलावी, झनकलाल बेनीराम मरसकोल्हे, नरेश हरिराम मोहने विजयी झाले. महिला राखीव गटातून लक्ष्मी रवींद्र कुमरे, साबेरा इस्माईल खा पठाण हया विजयी ठरल्या आहेत. इतर मागासवर्गीय गटातून नीलकंठ गणबा महाजन हे विजयी झाले. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती गटातील नकुल काशीराम बरबटे हे विजयी झाले तर ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातून रणवीर सोहनलाल यादव आणि उमेश गोरेलाल भांडारकर हे विजयी ठरले. ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती आणि जमाती गटातून बाबू परसराम वरखडे हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिक दुर्बल घटक या गटातून योगेश रमेश माथरे हे विजयी ठरले. त्याचप्रमाणे अडते व व्यापारी मतदारसंघातून भीमराव राजहंस आंबिलडुके आणि विजय शिवदास मदनकर हे विजयी झालेले आहेत तसेच हमाल व मापाडी मतदारसंघातून शंकर केजाजी तांबुलकर हे विजयी झाले आहेत. सर्व नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे रॅली काढून अभिनंदन करण्यात आले.