चीचाळा येथे राणी अवंतीबाई लोधी बलिदान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

रामटेक – बलिदान दिवसानिमित्त आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिरचे आयोजनवीरांगना राणी अवंतिबाई लोधी यांच्या बलिदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन चीचाळा  येथे आयोजित करण्यात आले होते. मनसर जिल्हापरिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य  सतीश डोंगरे यांनी आयोजित केले असून गावातील नागरिकांनी आरोग्य तपासनी करून घेतली. तसेच गावातील युवकानी मोठा संख्येने रक्तदान केले.
 यावेळी प्रामुख्याने मोहन माकडे जिल्हा परिषद सदस्य सरपंच सौ.कविताताई बशिने, शज्ञानेश्वर ढोक जिल्हा महामंत्री आदिवासी आघाडी भाजपा, नंदकिशोर कोहळे तालुका महामंत्री भाजपा, धर्मेश शुक्ला तालुका महामंत्री युवा मोर्चा, सुकेश डुमरे शिवगर्जना प्रतिष्ठान ,रामचंद्र मोहारे,पांडुरंग दमाहे माजी सरपंच, मोरेश्वर मोहारे, उदाराम बशीने, ओमकार बेनीराम मोहारे, उमेश गयगये, भास्कर गयगये,उपसरपंच सुनील गयगये, ग्रामपंचायत सदस्य शसेवकराम गेड़ाम, ओमेन्द्र मोहारे,ड्रा.स्मिता काकडे आरोग्य अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन आरोग्य सेवक रुखमोडे,सचिन गोंडाने PHC नगरधन डाक्टर भांगे रेनबो ब्लड बँक व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकारी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते
कार्यक्रमाला विशेष सहकार्य ग्रामपंचायत चीचाळा- हमलापुरी,प्राथमिक आरोग्य केंद्र,नगरधन,रेणबो ब्लड बँक,नागपूर,सेव्हन स्टार हॉस्पिटल,नंदनवन नागपूर यांचे लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पाणीबचत ही काळाची गरज -जिल्हाधिकारी आर. विमला

Mon Mar 21 , 2022
मोटारसायकल रॅलीतून जलजागृतीचा संदेश नागपूर :  सजीवांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्याचे संवर्धन, जतन आणि दैनंदिन वापरात काटकसरीने वापर करुन पाणीबचत करावी, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांनी केले. आज अंबाझरी तलाव येथून सुरु झालेल्या स्कूटर रॅलीला जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पाण्याबाबत जागृती निर्माण करणे, नागरिकांना जलसाक्षर करणे आवश्यक असून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com