नागपूर :- पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरियम मध्ये नागपूर शहर पोलीस व प्रजापीता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विमानाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रविन्द्रकुमार सिंपल पोलीस आयुक्त नागपूर शहर, अश्वती दोर्जे सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर तसेच प्रजापीता ब्रमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रम्हकुमारी दिदी मनमोहीनी यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाची रूपरेखा सहा पोलीस निरीक्षक अमोल दौड यांनी समजावुन सांगीतली बम्हकुमारी दिदी यांनी रक्षाबंधनाचे व रक्षामुत्राचे महत्व व अर्थ सविस्तर समजावुन सांगीतले तसेच त्यांनी रक्षाबंधनात सर्व बांधवांकडुन त्यांचेतील पाच अवगुणांचा त्याग करून पाच सदगुण धारण करावे व प्रत्येकाने योग, पवित्रता, प्रेम, सुख, शांती यातून सहज राजयोग साधता येतो त्याचे महत्व समजावुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना तसेच नागपूर शहरातील नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देवुन सर्वांनी सदभावनेने सण साजरा करावा असे आवाहन केले. यानंतर उपस्थितांना ब्रम्हकुमारी दिदी यांनी रक्षासुत्र बाधुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महिला अंमलदार यांनी सुध्दा रक्षासूत्र बांधुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन सपोनि, चंद्रकांत कोसे यांनी केले. पोलीस निरीक्षक भंडारकर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रमोद शेवाळे (उत्तर विभाग), शिवाजीराव राठोड (दक्षिण विभाग), सहा पोलीस आयुक्त वेलफेअर, पोलीस अधिकारी व अंमलदार, सेवानिवृत्त अधिकारी व बहुसंख्येने रोटरी क्लबचे सदस्य, एन.सि.सी ये महिला कंडेट्स व कार्यालयीन कर्मचारी हजर होते.