राजकुमार गुप्ता समाजभवन येथील व्यायामशाळेचे लोकार्पण

नागपूर, ता. २२ :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्र. १९ अंतर्गत बजेरीया येथील नन्हुमल इमारतीजवळील राजकुमार गुप्ता समाजभवन येथे मंगळवारी (ता.२२) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते जय बजरंग व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले.

            कार्यक्रमाला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, विनायकराव डेहनकर, ब्रजभूषण शुक्ल अजय गौर, हरीश महाजन आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, बजेरिया येथील राजकुमार गुप्ता समाजभवनमधून प्रभागातील जनतेला अनेक सुविधा प्रदान करता आलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना नागरिकांना लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी या समाजभवनामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. २४ हजारावर लोकांचा जीव वाचविण्यासाठी लसीकरणाचे कार्य समाजभवनातून झाले आहे. समाजभवन मध्ये लग्न कार्य व इतर कार्य व्हायचे. यामध्ये असामाजिक तत्वांचा वावर असल्याने नागरिकांना त्रास व्हायचा. नागरिकांच्या तक्रारीवर दखल घेत सभागृहाची स्वच्छता करून येथील नागरिकांच्या सुविधेसाठी व्यायामशाळा तयार करण्याचे निश्चित झाले. या व्यायामशाळेत आधुनिक उपकरणे, प्रशिक्षकांची व्यवस्था आणि व्यायामशाळेचे योग्य संचालन व्हावे यासाठी १५० रुपये एवढे नाममात्र शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

            आमदार विकास कुंभारे यांनी यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात शहरात सुरू असलेल्या विकास कामांची प्रसंशा करीत त्यांचे अभिनंदन केले. मध्य नागपुरातील भागांमध्ये होत असलेल्या विकास कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बहुजन समाज पार्टी दक्षिण-पश्चिम विधानसभेच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी

Wed Feb 23 , 2022
नागपूर – स्वछताचे जनक, अंधश्रद्धा विरोधी व प्रबोधनकार संत गाडगे बाबा ह्यांच्या 146 व्या जयंती निमित्त नागपूर बसपाच्या वतीने मेडिकल कॉलेज परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेतील गाडगे बाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, दक्षिण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांच्या हस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com