राज्यपालांच्या उपस्थितीत जे जे स्कुल ऑफ आर्टच्या राजभवनातील रेखाचित्र कार्यशाळेचे समापन
मुंबई :- राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचे समापन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाले.
राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पहिली व त्यांना कौतुकाची थाप दिली.
विद्यार्थ्यांनी काढलेली सर्व छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील असे राज्यपालांनी सांगितले व विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले.
यावेळी जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ विश्वनाथ साबळे, कार्यशाळेचे समन्वयक व अधिव्याख्याता प्रकाश सोनावणे तसेच सहयोगी अधिव्याख्याता शार्दूल कदम उपस्थित होते.
या कार्यशाळेत जेजेच्या ४८ पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तसेच २ अधिव्याख्यात्यांनी राजभवनातील विविध वास्तू तसेच शिवकालीन गडकिल्ल्यांची ५० रेखाचित्रे काढली.