कुही :- पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन कुही येथील टाकळी शिवार येथे काही इसम हे पैश्याची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहेत. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाले वरून पोलीस स्टाफ यांनी टाकळी शिवार येथे सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे- ०१) सलाउद्दीन यासुद्दीन वय ४२ वर्ष रा. मोमीनपुरा नागपुर ०२) वतन दादारावजी राउत वय ३७ वर्ष, रा. जुनी बिडीपेठ नागपुर ०३) दिलीप गौतम वहाने, वय ४३ वर्ष, रा. न्यु बिडीपेठ नागपुर ०४) मुजीब अहमद जमीर अहमद वय ४० वर्ष, रा. मोहमीनपुरा नागपुर ०५) जितु जागोबाजी दगडे वय ४५ वर्ष रा. भांडेप्लॉट नागपुर हे तासपत्यांवर पैशाचे हारजीतचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन नगदी ४०३७०/- रू. व ५२ तासपत्ते किंमती ५०/- रू. असा एकुण ४०३७५/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कुही येथे कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात प्रभारी कुही ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम, पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके, सोनकुसरे, पोलीस हवालदार चांगदेव कुथे, हरीदास चाचरकर पोलीस अंमलदार आशिष खंडाईत, अनिल करडखेले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.