– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- दिनांक ०८/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात पेट्रोलींग करित असतांना मौजा बोरखेडी गावाजवळ विश्वसनिय मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, ब्राम्हणी शिवारात सतीश तिजारे हा इसम त्यांचे शेतातील पोल्ट्रीफॉर्मचे आडमध्ये अवैधरित्या विनापरवाना देशी दारू बनविण्याचा कारखाना चालवून, बनावट देशीदारू तयार करून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्हयात विक्री करिता पाठवितो अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून मौजा ब्राम्हणी शेत शिवारात सापळा रचून छापा टाकला असता आरोपी नामे- १) अर्जुन शंकरसिंग राजपुत वय ५२ वर्ष रा. वार्ड क्र. ७८ जयसिंगपुरा यत्रमेल मार्ग वाटरहाउसचे मागे उज्जैन ह. मु. साई होटल एमआयडीसी बोरी, मशीन जवळ उभे असलेले ऑपरेटर २) योगेश सुभाष ब्राम्हणे, वय १९ वर्ष, रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ३) अनिल धानसिंग डावर, वय २३ वर्ष, रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश), बॉक्स मध्ये शिश्या भरून बॉक्स तयार करणारे ४) अर्जुन भोगी ब्राम्हणे, वय १९ वर्ष रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ५) अरविंद सुभाष ब्राम्हणे, वय १९ वर्ष रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ६) गणेश चिंदा जानव वय २५ वर्ष रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ७) दिपक महारिया ब्राम्हणे वय २५ वर्ष रा. मोहीदा वार्ड क.८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश), लहान प्लॅस्टीक शिश्यामध्ये द्रवपदार्थ भरणारे इसम ८) राहुल सुरेश जाधव वय २२ वर्ष रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ९) विशाल राजु परमार वय २५ वर्ष रा. मोहीदा वार्ड क्र. ८ शांतीनगर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह. मु. ब्राम्हणी ता. जि. नागपुर ग्रा. सुरेश तिजारेचे घरी मालवाहू गाडीचा ड्रायव्हर १०) साहेबराव मधुकरराव पाटील वय ४२ वर्ष रा. बोरवीर धुळे औरंगाबाद रोड ता. जि. धुळे ह. मु. हनुमान मंदीर जवळ शिरूळ सातगाव ता. हिंगणा जि. नागपुर व शेतमालक सतिश तिजारे असे एकुण ११ आरोपी कोणताही परवाना नसतांना नकली देशी दारू तयार करणेकरीता कारखाना तयार करून त्यामध्ये बनावट नकली देशी दारू तयार करून त्यावर नामांकित कंपनीचे बोगस लेबल लावुन तसेच दारूची वाहतुक करण्यासाठी परिवहनाकरिता मालवाहू गाडीत भरतांना मिळून आले. आरोपीताजवळून नकली देशी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, पॅकेजिंग करणारी मशीन, बनावट लेवल, फ्लेवर बॉटल, देशी दारू, वाहने व इतर साहित्य असा एकूण ५४४८५९२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूद्ध कलम ३२८, ४२०, ४६७, ४७९ ३४ भादंवि सहकलम ६५ A, B, C, D, E, F, ६७(१), A, ६७(C), ७२ ८३ ८६ ९० प्रविशन अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीतास जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात, परि पोलीस अधिक्षक तथा प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन कुही अनिल मस्के, परिविक्षाधीन पोलीस उप अविक राहुल झालटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, अरविंद भगत, मयुर ढेकळे, पोलीस नायक रोहन डाखोरे, अमृत किनगे, सतिश राठोड, पोलीस शिपाई राकेश तालेवार, निलेश इंगुलकर, राहुल साबळे, चालक पोलीस शिपाई सुमित बांगडे यांचे पथकाने केली.