राहुल गांधी, उद्धव ठाकरेंकडून महिला शक्तीचा वारंवार अवमान, अमरावती येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

– खा. नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमरावती :- हनुमान चालीसा म्हणल्याबद्दल खा. नवनीत राणा यांना 14 दिवस तुरुंगात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे, कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी महिला शक्तीचा वारंवार अवमान केला आहे. 33 टक्के आरक्षण देऊन महिला शक्तीचा सन्मान करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी- महायुतीच्या उमेदवार खा. नवनीत राणा यांना प्रचंड मतांनी विजयी करा,असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. अमरावती मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी – महायुतीच्या उमेदवार खा. नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ.अनिल बोंडे, खा.रामदास तडस, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे, आ. रवी राणा, आ. प्रवीण पोटे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविल्याची ”गुड न्युज ”आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच दिली. ते म्हणाले की न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्याचा विजय आहे. जात, धर्म, पंथ न मानणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिब, शेतकरी, आदिवासी, महिला यांच्या कल्याणाचा अजेंडा राबविला. 31 कोटी महिलांना कर्जे तर 83 लाख महिला बचत गटांना 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा.नवनीत राणा यांच्या संसदीय कारकीर्दीचा गौरव केला.  बावनकुळे म्हणाले की, खा.राणा यांनी लोकसभेत अमरावती मतदासंघाबाबत 534 प्रश्न विचारले. 113 चर्चांमध्ये भाग घेतला. अशा अभ्यासू खा.राणा यांना मतदार निवडून देतील.

हनुमान चालीसा भारतात नाही म्हणायचा तर पाकिस्तानात म्हणायचा का?

हनुमान चालीसा म्हणल्याबद्दल खा. नवनीत राणा यांना तुरुंगात टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मविआ सरकारवर श्री.फडणवीस यांनी जोरदार टीका केली. हनुमान चालीसा भारतात म्हणायचा नाही तर पाकिस्तानात म्हणायचा का, असा सवालही त्यांनी केला .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हलबांनो आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अन्याय व विश्वासघाताचा बदला घ्या

Thu Apr 4 , 2024
नागपूर :- राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने कोलबास्वामी सभागृहात चिंतन सभा आयोजित करण्यात आली हाती. या प्रसंगी मंचावर माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते ,जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई , जेष्ठ समाज सेवक प्रकाश निमजे उपस्थित होते.आदिम साहित्य संगिनी व इतर संस्थमार्फत सेवानिवृत्त झालेले अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांचा जाहीर सत्कार या चिंतन सभेत करण्यात आला ,त्यावेळी मंचावर विश्वनाथ आसई ,आदिम नेत्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com