गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच मजबूत पाया- खुशालराव पाहुणे

धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण.

नागपुर : – गुणवत्तापूर्ण शिक्षण याच धर्तीवर मार्गक्रमण करीत धर्मराज प्राथमिक शाळेची गेल्या २५ वर्षांची वाटचाल राहिली असून यात कुठलीही तडजोड होणार नसल्याचे मनोगत  खुशालराव पाहुणे यांनी व्यक्त केले.
धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त “रौप्य महोत्सव” लोगोचे आज (ता १४) अनावरण करण्यात आले आले. त्यावेळी ते बोलत होते. धर्मराज शैक्षणिक परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इंदिरा एज्युकेशन सोसायटी पिवळी नदी नागपु रचे संस्थापक अध्यक्ष  खुशालराव पाहुणे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पिवळी नदी नागपुरचे मुख्याध्यापक  सुनील झलके, धर्मराज विद्यालया च्या मुख्याध्यापिका पमिता वासनिक, उपमुख्या ध्यापक  रमेश साखरकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  खिमेश बढिये, ज्येष्ठ शिक्षक श्री दिनेश ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  खिमेश बढिये यांनी करुन शाळेच्या २५ वर्षांतील कार्यकिर्दीचा आढावा सादर केला. आगामी वर्षभर “रौप्य महोत्सवी वर्षां” निमित्ताने विद्यार्थी व समाज पूरक राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना  खुशालराव पाहुणे यांनी धर्मराज शैक्षणिक संस्थेने गुणवत्ता, प्रामाणिकता, कठोर मेहनत व विद्यार्थी हित या बाबीला प्राधान्य दिले. यातूनच संस्थेने आपला एक वेगळा ठसा उमटविला. यातीलच धर्मराज प्राथमिक शाळेने २५ वर्षांची यशस्वी वाटचाल केली असून अशीच वाटचाल गुणवत्तापूर्ण शिक्षणातून शिक्षकांनी कायम ठेवावी असे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार अमीत मेंघरे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाला  चित्रलेखा धानफोले,  भिमरा व शिंदेमेश्राम,  अमीत मेंघरे,  किशोर जिभकाटे, राजू भस्मे,  शारदा समरीत,  अर्पणा बावनकुळे, हर्षकला चौधरी,  प्रिती सुरजबंसी, पूजा धांडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खापा में हिरण का मांस सह तीन कछुए बरामद, 1 आरोपी गिरफ्तार

Wed Feb 16 , 2022
सावनेर – खापा में हिरण के शिकार का मामला सामने आया है |जिस्मे वन विभाग व  पोलीस  की संयुक कार्यवाही के दौरान  १ आरोपी को गिरफ्तार किया गया है साथ ही  मोके  पर हिरण का मांस तथा तीन कछुए  भी बरामद की है | प्राप्त जानकारी के अनुसार वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी को हिरण का शिकार कर खापा शहर के वार्ड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!