संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी खैरी ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्राम पंचायत खैरी येथे 31 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती निमित्य व महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ग्रा.पं.कार्यालय खैरी इथे जयंती साजरी करून महिला व बाल विकास श्रेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिला शशिकला शैलेश गायकवाड व विद्या अरविंद नितनवरे यांची निवड करून संम्मानपत्र, संम्मानचिन्ह, शाल श्रीफळ व प्रती महिला ५०० रुपये बक्षीस देण्यात आले. तसेच जुने ग्रा.पं.कार्यालय खैरी इथे शासना मार्फत राबविण्यात येणारी सौंदर्य प्रसाधनगृह योजना चे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रा.पं. खैरी चे सरपंच योगिता किशोर धांडे, उपसरपंच रामदयाल ठाकरे ग्रा. पं. सर्व सदस्य गण तसेच ग्रा. पं. भिलगाव सदस्य लतेश्वरी काळे, माजी सरपंच कविता आदमने, माजी सदस्य धर्मराज आदमने, ब्युटीपार्लर शिक्षिका विशाखा जनबंधू, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य मदतनीस, आरोग्य सेविका, बचतगटातील सर्व महिला उपस्थित होते.