अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोस्टे मौदा हद्दीत अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय सुत्रानुसार भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर टिप्पर क्र. MH-40/BL-1806 हा येतांना दिसल्याने सिंगोरी शिवारातील सिंगोरी फाटयावर नाकाबंदी दरम्यान टिप्परला थांबवून पाहणी केली असता टिप्पर क्र. MH-40/BL-1806 मध्ये अंदाजे ०६ ब्रास रेती मिळुन आल्याने सदर टक चालकास टक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती बोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीचे ताब्यातून टिप्पर क्र. MH-40/BL-1806 किंमती २०,००,०००/-रू, व त्यामधील ०६ ब्रास रेती किमती २४,०००/-रू. असा एकूण २०,२४,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालक आरोपी नामे नरेश महादेव डोंगरवार, वय ४० वर्ष, रा. कोंडी ता. जि. भंडारा तसेच टिप्पर मालक पंकज गजानन गावंडे, वय ३० वर्ष, रा. नवरगाव ता. मौदा यांचेविरूद्ध कलम ३७९, १०९, ३४ भादंवि. सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतिशसिंग राजपूत, सपोनि मनोज चौधरी, पोहवा प्रकाश गाठे, पोलीस अंमलदार शुभम ईश्वरकर, अतुल निंबारते, आशिष रडके यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘ऑल इंडिया जमियतूल कुरैश’चे नितीन गडकरींना समर्थन

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- ‘ऑल इंडिया जमियतूल कुरैश’ या कुरैश समाजातील सामाजिक संघटनेने नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. नितीन गडकरी यांना समर्थन जाहीर केले आहे. दि. १२ एप्रिलला गरीब नवाज नगर मैदानावर संघटनेचे अध्यक्ष अब्दूल गनी कुरेशी यांच्या नेतृत्वात ना. गडकरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत जाहीर केला. माजी नगरसेवक बंडू तळवेकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com