शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

कुही :- दिनांक ०९/०३/२०२० चे ०४/२३ वा. दरम्यान फिर्यादी नामे पोशि/८६९ देवेन्द्र विनायक बुटले पो.स्टे. कुही यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. कुही येथे १२०/२० कलम ३५३, ५०६ भादंवि, कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

दिनांक ०९/०३/२०२० से ००/३० ते ०१/०० वा. दरम्यान यातील फिर्यादी हे पांचगाव चौकी येथे आपले कर्तव्यावर हजर असतांना फिर्यादीची तक्रार घेत असतांना आरोपी नामे सुरज धनराज खोब्रागडे वय ३० वर्ष रा. उटी हा पोलीस पांचगाव चौकी येथे आला व माझे वडिलाला तुम्ही खाली का बसविले त्याला खुर्चिवर का बसविले नाही, मला चौकशी करू दया, तुम्ही कशाची तकार घेता, मी मिडीया बोलावतो असे म्हणुन चौकीतील कार्यालयीन काम करीत असलेल्या टेबलावरील कागदपत्रे फेकफाक केले. त्यानंतर फिर्यादी हे गणवेशात असतांना फिर्यादीचे अंगावर धावुन गेला व त्याची कॉलर पकडली. त्यानंतर चौकीत हजर असलेले कर्मचारी यांनी त्याचे तावडीतुन फिर्यादीची सुटका केली. अशा प्रकारे यातील फिर्यादी हे आपले कर्तव्यावर हजर असतांना नमूद आरोपी याने त्याचे शासकिय काम करीत असतांना अडथळा निर्माण करून, कॉलर, पकडून, तु पांचगाव चौकी येथे कशी नौकरी करते ते पाहून घेईन अशी धमकी दिली.

सदर प्रकरणाचे तपास सपोनि सोनटक्के यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. नागुर सो. कोर्टामध्ये सादर केले, आज दिनाक ०८/०१/२०२४ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. नागुर यांनी सदर गुन्हयात आरोपीकडुन १,००,०००/- रूपये रक्कमेचा २ वर्ष चागल्या वर्तणूकीचा बॉन्ड घेण्यात आला. सरकारचे वतीने एपीपी नावर  यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन सफौ, प्रमोद बन्सोड पो.स्टे. कुही यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PHD पेपर फुटीनंतर विद्यार्थी झाले आक्रमक

Wed Jan 10 , 2024
नागपूर :-महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पेपर फुटल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरु केला. पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थांनी केलेला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थांनी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर संताप व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थांनी पेपर फुटलेला असल्याने परीक्षेवर देखील बहिष्कार केला आहे. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!