विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

सावनेर :- फिर्यादी / पिडीता वय १५ वर्ष यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे, सावनेर येथे अप. क्र. ४७०/२२ कलम – ३५४, ३५४(अ), ३२३, ५०६ २९४ भादवि सहकलम ८ १२ पोक्सो ७५ आय टि ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

यातील फिर्यादीचा आरोपी नामे- गणेश उर्फ जरक्या सुरेश चौधरी, वय ४२ वर्ष रा. टाकळी भन्सारी सावनेर हा वडील असुन यातील पिडीत फिर्यादी ही घरी एकटी असता आरोपीने दात घासण्याचा नस मागण्याच्या बहाण्याने फिर्यादीला जवळ बोलावुन आरोपीने अश्लील हावभाव केले व आरोपीने पिडीतेच्या मनावर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पिडीतेने विरोध केला असता अश्लील भाषेत बोलूण शिवीगाळ करूण मारहाण केली.

सदर प्रकरणाचे तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियका गेडाम पो.स्टे. सावनेर यानी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ३१/०७/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. ११ शेन्डे न्यायाधिश नागपूर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३५४ भादवि मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व ९०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, कलम ३५४(अ) भादवि मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व कलम ३२३ भादवि मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १०००/-रु. दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने ए.पी.पी. गवळी यानी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अमलदार म्हणुन पोलीस हवालदार मधुकर आदमने पो.स्टे. सावनेर यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

Tue Aug 1 , 2023
सावनेर :- अंतर्गत 04 कि.मी अंतरावरील आय टी आय सावनेरचे गेट समोर सावनेर येथे दिनांक २९/०७/२०२३ ला यातील फिर्यादी नामे– अंकित अरुन कडू, वय २६ वर्ष, रा. आदासा ता. कळमेश्वर ह. मु बसवार ले आउट सावनेर हे आरोपी नामे- १) १) महादेव पुरे २) सुरेश मोतीराम बिलवार ३) विनोद बंबुरे सर्व रा. पहिलेपार सावनेर यांना चांगल्या प्रकारे ओळखत असून आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com