नागपूर :-पो.स्टे. खापा फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. खापा येथे अप. क्र. १२९/१८ कलम ३७६ (२) (एल) भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्हयात दिनांक १८/०६/२०१८ चे पुर्वी यातील आरोपी नामे दशरथ तातोबाजी साळवे, वय ५६ वर्ष रा. कोदेगाव त. सावनेर याने पिडीता ही मतीमंद असल्याचा फायदा घेवुन पिडीतेसोबत जबरी संभोग केला. त्यामुळे पिडीता ही आठ महिण्याची गर्भवती झाली.
सदर प्रकरणाचे तपास पोउपनि गोपीचंद नेरकर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. १० आर.आर. भोसले साो. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनाक २२/०४/२०२४ रोजी मा. डी. जे. १० आर.आर. भोसले सतो. यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३७६ (२) (जे) (आय) भादवि मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व २,००,०००/- रू. दंड. दंड न भरल्यास एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी गवळी यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार महणुन मपोना वर्षा भुमाळ पोस्टे खापा यांनी मदत केली आहे.