मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा

            मुंबई : – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.  या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.

            शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूर कडे प्रयाण. पंढरपूर येथे रात्री ११.३० वा. आगमन व शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.

 रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थिती.

पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन.

पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.  सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे  सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.

सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.

दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोरोना लसीकरणास सहकार्य करा

Sat Jul 9 , 2022
शाळा महाविद्यालयांना सुचना चंद्रपूर  –  कोरोना विषाणूचे स्वरूप दर वेळेस बदलत आहे, आज जरी रुग्णसंख्या कमी असली तरी दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यास सहकार्य करण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत केल्या. मनपा आरोग्य विभागामार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेस योग्य ते सहकार्य मिळावे या दृष्टीने शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com