सावनेर :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. सावनेर येथे अप. क्र. ५४६/२० कलम ३७६, ३७६ (३), ५०६ भादवि, सहकलम ४, ५ (जे) (२),५ (एल), ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्हयातील फिर्यादी व आरोपी नामे राजेश गुनाजी बोरीवार, वय ३० वर्ष, रा. कुसुंबीता. सावनेर जि. नागपुर हे एकमेकांचे घराजवळ राहत असुन नातेवाईक असल्याने आरोपीचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हिला पोटदुखी व उलटयांचा त्रास होत असल्याने फिर्यादीने अल्पवयीन मुलगी हिला विचारपूस केली असता तिने सांगितले की माहे डिसेंबर २०१९ मध्ये एके दिवशी आरोपीने ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेवुन तिच्यासोबत बळजबरीने जबरी संभोग केला. त्यानंतर तीन चार वेळा त्याच महिन्यात जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्यामुळे पिडीता हि तीन महिन्याची गरोदर राहिली, फिर्यादीने आरोपीचे घरी जावुन जाब विचारले असता आरोपीने कबुली दिली. त्यावर पिडीताचे आरोपीसोबत लग्न करून देवु असे ठरले व बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने पोलीस ठाणे येथे रिपोर्ट दिली नाही, दिनांक ०९/०९/२०२० रोजी पिडीतेची प्रसुती होवुन मुलगा झाला परंतु आरोपी व त्याचे घरच्यानी भांडण करून पिडीतेचे आरोपीशी लग्न लावुन देणार नाही. तुझ्याने जे होईल ते कर असे म्हणाले.
सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक रासकर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. ओखंडे अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर कोर्टामध्ये सादर केले. आज दिनाक २७/१२/२०२३ रोजी मा. श्रीखंडे अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी वरील नमुद आरोपीला सदर गुन्हयात कलम ६ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास व कलम ५०६(१) भादवि मध्ये २ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी बालपांडे यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोहवा मधुकर आदमने पो.स्टे. सावनेर यांनी मदत केली आहे.