जबरी संभोग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

कुही :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ९०६ / २०१७ कलम ३७६ (२) (आय) भादवि सहकलम ४, ५, ६, ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

यातील फिर्यादी व विधीसंघर्षग्रस्त बालक हे एकमेकांच्या घराशेजारी राहत असुन यातील विधीसंघर्षग्रस्त बालक याने फिर्यादीच्या अल्पवयीन पिडीत मुलीला स्वतः चे घरी घेवुन गेला व मुलाशी जबरी संभोग केला. सदर प्रकरणाचे तपास पोनि. काळे यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रवि. करीता डी. जे  झपाटे सो. कोर्टामध्ये सादर केले. दिनांक ०२/०९/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे  झपाटे यांनी सदर गुन्हयातील आरोपीला कलम ३७६ (२) (आय) भादंवि मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व २०,०००/-रू दंड. दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडातल्या रक्कमेमधील पिडीतेला १९,०००/- रु. देण्याचे आदेश दिले आहे.

सरकारचे वतीने ए.पी.पी. नायर  यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोहवा / ११५१ दिलीप लांजेवार पो स्टे कुही यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्नीला मानसिक व शारीरीक त्रास देणा-या पती विरुद्ध गुन्हा दाखल

Mon Sep 4 , 2023
काटोल :- अंतर्गत महाराणा प्रतापनगर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपुर येथे यातील फिर्यादीस आरोपी क. १) मनोज विरमसिंग डुगलब २) चंपा बिरमसिंग डुगलब दोन्ही व महाराणा प्रतापनगर वार्ड, बल्लारशाह फिर्यादीला “माहेरून पैसे घेवुन ये असा तगादा लावून ती शारीरिक व मानसिक त्रास देत असुन पतीचे त्रासाला कंटाळून फिर्यादी गेल्या एक वर्षा पासून माहेरी काटोल येथे राहत होती. दिनांक ०१.०९.२३ चे १७.०० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com