फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-फिर्यादी रविन्द्र दशरथ मोहाजे, वय ५९ वर्षे, रा. प्लॉट नं. २३, विश्वकर्मा नगर, रोड नं. ४, अजनी, नागपुर यांना त्यांचे मोबाईलवर मोबाईल क. ९११९३४५७२९ या धारक रोहन जोशी नावाचा ईसम तसेच मोवाईल क. ९१८९८२०५६०७९ ची धारक आयशा झा नावाची महिला यांनी संगणमत करून फिर्यादीस एसबीआय सर्विस ग्रुप व व्हीआयपी ग्रस्क फोर्स या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मॅसेज करून फिर्यादीस विश्वासात घेतले व फिर्यादीस स्टॉक/शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन, आमीष दाखवुन वेगवेगळ्‌या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करायला भाग पाडुन, त्यांचे खात्यामधुन आरोपी यांनी त्यांचे वेगवेगळ्या खात्यावर एकुण ६६,५०,२१८/-रू. घेवुन, नमुद रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे पोउपनि उपाध्ये यांनी आरोपों विरूध्द कलम ३१६(२), ३१८(४), १११(२) (ब) भा.न्या. सं. सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर सीमेलगत मध्य प्रदेशातील जिल्ह्यांचे पूर्ण सहकार्य

Wed Aug 28 , 2024
Ø नागपूर व मध्य प्रदेश सीमेलगत जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक नागपूर :- आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत मध्यप्रदेशमधील जिल्ह्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व समन्वय राखण्यात येईल,असा विश्वास आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मध्य प्रदेशाच्या सीमा लगत जिल्ह्यांशी समन्वयाद्वारे विधानसभा मतदारसंघात शांततेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com