बेला :-पो.स्टे. बेला यातील फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. बेला येथे अप. क्र. ११/२०२० कलम ३६३, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६ भादवि सहकलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादीच्या अल्पवयीन बहिणीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रोपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद झाला होता. तपासा दरम्यान आरोपी नामे- विशाल ज्ञानेश्वर बिरसागर, वय २४ वर्ष, रा. चिखली समुद्रपुर जि. वर्षां याने फिर्यादीच्या अल्पवयीन बहिणी सोबत प्रेमसंबंध ठेवुन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयामध्ये कलमवाढ करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोस्टे बेला यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोटमध्ये सादर केले. आज दिनांक १९/०४/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. जयस्वाल नागपूर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ६ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २०००/-रु. दंड, दंड न भरल्यास ०३ महिने साधी कैद तसेच ४ पोक्सो मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व १०००/-रु. दंड, दंड न भरल्यास ०१ महिने साधी कैद. कलम ३६३ भादवि मध्ये ०५ वर्ष सश्रम कारावास व १०००/- दंड दंड न भरल्यास ०१ महिना साधी कैद. कलम ५०६ भादवि मध्ये ०३ महिने साधी कैद व ५००/-रु. दंड, दंड न भरल्यास ०१ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी खापर्डे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा संजय इंगोले यांनी मदत केली आहे.