वेलतूर :- फिर्यादी नामे लवा वसंता सलोटे, वय ४२ वर्ष रा. भुयार यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. वेलतूर येथे अप. क्र. ४४/२२ कलम ४९८ (अ), ३०६, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्हयात फिर्यादीची मृतक मुलगी व आरोपी हे पती पत्नी असुन फिर्यादीची मृतक मुलगी नामे सपना शेषराव उरकुडे वय २२ वर्ष रा. देवळी कला हिचे १० महिण्यापुर्वी आरोपी नामे शेषराव दादाजी उरकुडे वय ४२ वर्ष याचे सोबत लग्न झाले होते. आरोपी हा लग्ना पासुन मृतक पत्नी सोबत चांगला वागत नव्हता व दोघांमध्ये नेहमी झगडे भांडन होत असल्याने दिनांक २९/०३/२०२२ से १४/०० वा. ते १४/३० वा. आरोपी क १) शेषराव दादाजी उरकुडे वय ४२ वर्ष २) माधव दादाजी उरकुडे वय २८ वर्ष दोन्ही रा. देवळी कला यांनी मृतक हिला मारहान केले असता आरोपीच्या शारिरीक व मानसीक त्रास देण्याचा कारणावरून मृतकने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केली. आरोपीने मृतक हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने मृतकने आत्महत्या केली.
सदर प्रकरणाचे तपास सपोनि डोर्लीकर पो.स्टे. वेलतुर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता एडिजे २ पवार कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ०५/०८/२०२४ रोजी एडिजे २ पवार यांनी वरील दोन्ही आरोपीस कलम ३०६ भादंवी मध्ये ३ वर्ष सश्राम कारावास व प्रत्येकी २०००/- रू. दंड, दंड न भरल्यास २ महीने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी डगोरीया यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोअं. अमर श्रावणकर पोस्टे वेलतूर यांनी मदत केली आहे.