राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे पुणे संघाला अजिंक्यपद

– 17 वर्षाखालील शालेय स्पर्धेमध्ये मुले व मुली गटाचे अजिंक्यपद

नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व नागपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभागाने मुले व मुलींच्या दोन्ही गटाचे अजिंक्यपद प्राप्त केले.

आनंद नगर स्पोर्ट्स असोसिएशन, नागपूरचे मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात अत्यंत चुरशीच्या सामन्यात पुणे विभाग संघाने छत्रपती संभाजीनगर संघाचा 3-1 अशा डावाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या गटात पुणे विभागाने कोल्हापूर विभागाचा 3-0 अशा सरळ डावाने पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. मुलांच्या गटात लातूर विभागाने व मुलींच्या गटात नागपूर विभागाने तृतीय स्थान प्राप्त केले.

सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण नागपूर दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहन मते, शेखर पाटील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा नागपूर, माजी नगरसेविका दिव्या धुरडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, अरविंद गवई व इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. याच स्पर्धेतुन राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड केली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्मार्ट सिटीने बदलले पूर्व नागपूरचे चित्र - केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन 

Mon Oct 7 , 2024
– पूर्व नागपुरातील विविध कामांचे ना. गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण नागपूर :- स्मार्ट सिटी असणाऱ्या नागपूर शहरात सर्वत्र विकास होत आहे. शैक्षणिक संस्था, आरोग्य विषयी सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, चांगले रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यामुळे शहर बदलत चालले आहे, अशात पूर्व नागपूरचा विकास देखील झपाट्याने होत आहे, स्मार्ट सिटीने पूर्व नागपूरचे चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com