जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

   मुंबई, (रा.नि.आ.) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतीलअसे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगडरत्नागिरीसिंधुदुर्गनाशिकजळगावअहमदनगरपुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूरऔरंगाबादजालनापरभणीहिंगोलीबीडनांदेडउस्मानाबादलातूरअमरावतीबुलढाणायवतमाळवर्धाचंद्रपूर आणि गडचिरोली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बच्चु कडु प्रहार जनसक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व डोळे तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Thu Jul 7 , 2022
अमरदिप बडगे तिरोडा :- तालुक्यातील सरांडी गावात बच्चु कडू प्रहार जनसक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर काल गाम पंचायत सरांडी येथे आयोजित करण्यात आला होता. महात्मे नेत्र तपासणी व रक्तदान नागपुर यांच्या सर्व चमूने तपासणी व रक्तदान कार्य केले. यावेळी 250 रुग्णाना मोतियाबींदु निघले असुन त्यांच्यावर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.डोळे तपासून चष्म्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com