नागपूर :- शहरातील भुमाफीया व अवैध सावकारी करणारे इसमां बावत कुणाचीही तक्रार असल्यास, तक्रारदारांनी कोणालाही न घाबरता तकार देण्यास दिनांक १५,०७,२०२४ रोजी ११.०० वा. पोलीस भवन, ऑडीटोरीयम हॉल येथे योग्य कागदपत्रांसह हजर यावे असे आवाहन जनतेला करण्यात आलेले होते. नागपूरातील जनतेने या आवाहनाला प्रतिसाद देवून ज्या तक्रारदारांवर भुमाफीया व अवैध सावकार यांनी बळजबरी करून, धाक दाखवुन अन्याय केलेला होता. त्यांना न घाबराता आज रोजी पोलीस भवन येथे एकुण २५२ पिडीत नागरीक त्यांचे तकरांचे निवारणा करीता उपस्थित होते. रविन्द्र सिंघल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी सर्वांची दखल घेवुन सर्व अर्जदारांना योग्य तो न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. उपस्थित तक्रारदार यांनी पोलीस आयुक्त यांना विचारलेल्या प्रश्नाची पोलीस आयुक्त यांनी उत्तर देवुन त्यांचे समस्यांचे निराकरण केले, व सर्व अर्जदारांचे अर्जाची तात्काळ दखल घेवुन परिमंडळनिहाय पोलीस उप आयुक्त यांना अर्जदारांचे अर्जाचे निराकरण करण्याविषयी आदेशीत केले.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ क. १ ते ५ यांनी तक्रारदारांची चर्चा करून त्यांचे कडील अर्ज पोलीस ठाणे निहाय पोलीस ठाणे प्रभारी यांचे मार्फतिने स्वीकारले. नागपूर शहर अंतर्गत परिमंडळ क. १ मध्ये एकुण ३२ तकरारदरांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. परिमंडळ क. २ मध्ये एकुण ६३ तकरारदारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. परिमंडळ क. ३ मध्ये एकुण १७ तकारदरांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. परिमंडळ क. ४ मध्ये एकुण १०६ तकरारदारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. परिमंडळ क. ५ मध्ये एकुण ३४ तक्रारदरांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. संपुर्ण शहर अंतर्गत एकुण २५२ तकारअर्ज प्राप्स झालेले असुन त्यापैकी ३० अर्जदारांचे अर्जावरून तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. इतरही संपुर्ण अर्जाची योग्य चौकशी व पळताडणी होवुन संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जनता दरबारामध्ये सह. पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग), शिवाजी राठोड, पोलीस उप आयुक्त डिटेक्शन निमीत गोयल, यांनी सुध्दा अर्जदारांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य तो न्याय मिळवुन देण्याची खात्री दिली. याप्रसंगी बहुसंख्येने अर्जदारा त्यांचे नातेवाईक, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.