– शिवपुराणाची तयारी अंतिम टप्प्यात
– पंडित प्रदीप मिश्रा शिवपुराण कथा : लाखो भाविक घेणार शिवपुराणाचा लाभ – आ. मोहन मते
नागपूर :- लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कथा दिनांक 17 ते 21 ऑक्टोबर २०२३ दरम्यान दिघोरी, उमरेड रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लाखो भाविक कथा एकत्रितपणे बसून ऐकतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण नागपूरचे आमदार तथा संयोजक मोहन मते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना मोहन मते यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी सुमारे 80 एकर परिसरात 2 लाख 50 हजार चौरस फुटात येणाऱ्या भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज भाविकांसाठी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी 50 हजार चौरस फुटाचा डोम उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेश द्वाराची तर अतिविशेष निमंत्रितांसाठी एक प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी 22 विविध समित्यांचे 5 हजार स्वयंसेवक दिवसरात्र कष्ट घेत आहेत. याव्यतिरिक्त संपूर्ण परिसर सिसिटिव्हीच्या निगराणीमध्ये राहणार आहे. दिघोरी नाक्यापासून ते कथा स्थळापर्यंत स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात सुरक्षा रक्षक, अग्निशमन, पोलिस, रूग्णवाहिका सतत 24 तास सेवेत उपलब्ध असणार आहे. याशिवाय डॉक्टसची उपस्थित राहणार आहे. चमू देखील
या कथेला नागपुरातून तसेच विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधून भाविक येणार आहे. त्यांच्यासाठी व्यवस्था पूर्णपणे सज्ज करण्यात आली असल्याची माहिती आ. मोहन मते यांनी दिली.