नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे शनिवार दि. २६/११/२२ रोजी व्हेरायटी चौक गांधी पुतळा येथे रामदेव बाबा यांनी म्हटले की काही महिलांनी साडी नाही घातली तरी चांगल्या दिसतात असे वारग्रस्त व्यक्तव्य केले. याविषयी रामदेव बाबा यांचे निषेध आंदोलन करुन नारेबाजी करण्यात करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे व नागपूर शहर प्रवक्ता नूतन रेवतकर यांनी योगगुरु रामदेव बाबा यांचे वक्तव्य हे लज्जास्पद आहे. रामदेव बाबांच्या शेजारी अमृता फडणवीस बसल्या होत्या. परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत. कोणतीही आणि कितीही मोठी व्यक्ती असो, असं बोलणाऱ्यांच्या कानाखाली मारली पाहिजे, असे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व शहर प्रवक्ता नूतन रेवतकर यांनी म्हटले. एकीकडे तुम्ही स्त्रियांच्या रक्षणाच्या गोष्टी करतात आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा अपमान करतो, हे खूप लज्जास्पद आहे,
यावेळी महेंद्र भांगे, भैयालाल ठाकूर, अश्विन जवेरी राजेश पाटील, मिलिंद वाचनेकर, प्रशांत बनकर, आशुतोष बेलेकर, नंदू माटे, राजा बेग, पिंकी शर्मा, राजेश शर्मा ,जीवन रामटेके, उमकांत मसराम, नसीम सिद्दीक़ी, रेखा कुपाले,अरशद अंसारी, संगीता खोबरागड़े, सुकेशनी नारनौरे, सुनीता खत्री, आकाश चीमनकर, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.