– मोवाड येथील घटना पिडीतानी केली नुकसान भरपाईची मागणी
नरखेड :- मोवाड शहरातील वॉर्ड क्र. १ येथे राहणारे तोताराम नथुजी बालपांडे याच्या घरी दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११: ३० च्या दरम्यान अचानक आग लागली बांलपाडे हे शेतात गेले होते. घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे चुलीवर नेहमी स्वयंपाक करायचे अशातच स्वयंपाक झाल्यावर पूर्णपणे विस्तव विजवण्यात आला नव्हता आणि घरचे सगळे लोक शेतात गेले होते त्यामुळे चुलीत विस्तव वाढत गेल्याने आजूबाजूला आग वाढण्याचे साहित्य होते त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली घरातील सर्वत्र सामान जळून खाक झाले. नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत अग्निशामक गाडीने आग विझविण्यात आली यामध्ये जीवित हानी कोणतीही झाली नसून मात्र घरातील संपूर्ण सामान जळून अंदाजित २० हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. नुकसानीची संपूर्ण माहिती पटवारी यांना सादर करण्यात आली व नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यात यावी अशी मागणी पीडित तोताराम बालपांडे यांनी शासनाला केली आहे.