नागपूर : सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मकर संक्रातीचे कालावधीनंतरही म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत जिल्हयातील ग्रामीण भागात नागरीक व व्यवसायी यांना नायलॉन मांजाचे विक्री, साठवणूक व वापर करण्यास तसेच नायलॉन मांजा व प्रतिबंधीत साहित्य ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे पुरविण्यास तसेच नायलॉन मांजा कुरिअरद्वारे वाहतूक करण्यास मनाई आदेश जारी केले आहे. या कालवधीत नायलॉन मांजाची (साठवणूक. विक्री करतांना आढल्यास) साठवणूक, विक्री, वापर करणाऱ्याविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.
नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनीक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे नागपूर जिल्हयातील ग्रामिण भागातील ब-याच नागरीकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. जसे, गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होणे तसे दुचाकी वाहन चालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होतात. अशा प्रकारे नायलॉन मांजा नागरीकाच्या तसेच पशु पक्षी यांचे “जीवीताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. त्याच प्रकारे नायलॉन मांजा खांबावर, रस्त्यावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे पर्यावरणास धोका संभवतो. त्यामुळे पतंग उडवितांना नायलॉन धागा वापरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
@ फाईल फोटो