दसरा मेळाव्यासाठी गोंदियातील आमगाव येथून 300 कार्यकर्ता रवाना

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

पाच बस मधून शिंदे कार्यकर्ते मुंबई ला निघाले

५० पेक्षा अधिक महिलांचा कार्यकर्त्यांचा समावेश

गोंदिया :- दसरा मेळाव्याला ठाकरे गटाला शिवतिर्थावर परवानगी मिळाल्यावर दोन्ही गट शक्तिप्रदर्शना साठी आटापीटा करू लागल्या आहेत. तर दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर शिवसेनेत उत्साह संचारला आहे. तिकडे शिंदे गट सुद्धा दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही गटांनी मोठी गर्दी करत आम्हीच खरी शिवसेना हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर शिंदे गट सुद्धा दसरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणत गर्दी असणार या साठी अनेक कार्यकता आता मुंबई कडे रवाना होत आहेत. तर आज गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुक्यातून तबल ३०० शिंदे कार्यकर्ता मुंबई कडे रवाना झाले आहे. तर हे ३०० शिंदे कर्यक्रता पाच बस मधुन निघाले असुन या ३०० कार्यकर्ता मध्ये ५० च्या अधिक महिलांचा देखील समावेश असुन शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यात सहभागी होण्या करिता निघाले आहेत.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com