संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’लावण्यात यावा तसेच यात कसूर करणाऱ्या अधिकारी व शिक्षण संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आक्रमक आंदोलन करेल असा ईशारा पदाधिकाऱ्याकडून प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आला आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट् राज्य सरकार कडून राज्य गीताचा दर्जा देण्यात आला.जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट सरकारने स्वीकारून एक वर्ष लोटल्या नंतरही या गीताचा पाहिजे तसा सन्मान होताना दिसत नाही . 26 जानेवारी,15 ऑगस्ट व 1 मे ला तहसील कार्यालय ,नगर परिषद वा इतर ठिकाणी फक्त याच दिवशी हे राज्य गीत गायल्याचे ऐकिवास येते मात्र बऱ्याचश्या ठिकाणी व शाळा महाविद्यालयात हे राज्य गीत गायताना दिसत नाही याचे आश्चर्य वाटते तेव्हा कामठी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात राज्यगीत जय जय महाराष्ट् माझा हे गायले जावे व यात कसूर करणाऱ्या अधिकारी व शिक्षण संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने संयोजक राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे,कोमल लेंढारे,गीतेश सुखदेवें,विकास रंगारी, आनंद गेडाम,आशिष मेश्राम,राजन मेश्राम, सुमित गेडाम, रायभान गजभिये,मनोज रंगारी, कृष्णा पटेल आदींनी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.