कामठीत ‘होऊ द्या चर्चा’शिवसेना जागर अभियान अंतर्गत कार्यक्रम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागरण अभियान अंतर्गत कामठी विधानसभा मतदार संघात सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’नागरिक संपर्क सभेचे आयोजन रविवार 8 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजता बुद्ध नगर कामठी येथे करण्यात आले होते त्यानंतर रामगढ तसेच 9 ऑक्टोबर ला सैलाब नगर व छत्रपती नगर येथे करण्यात आले होते.

सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या फसव्या घोषणा आणि योजनांचे वाभाडे काढताना पूर्व विदर्भ संघटक प्रमुख सुरेश साखरे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार वर टीका करत हे सरकार फक्त अदानी आणि अंबानीचे आहे, इथे शेतकरी कर्ज माफी देताना पै चा हिशोब ठेवला जातो ,शासनाने शेतकरी वर्गासाठी सध्याच्या संकटात कोणतीही मदत न करता फक्त फसव्या घोषणांचे पाऊस पाडण्याचे काम केले या शब्दात टीकास्त्र सोडले.

याप्रसांगी राधेश्याम हटवार, मुकेश यादव, प्रशांत गजभिए, जीवन रामटेके, रमेश वैद्य, शंकर तालमले, नरेश यादव ,सुरज दास ,प्रशांत खोब्रागडे, आकाश टेंभुरने , जितु गुज़र, संदेश सरोजकर विनोद मोरे, वीरेंद्र खोब्रागडे, वसीम खान, शिव यादव, जितेंद्र गुजर ,भारत नानट ,रितेश केझरकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.10 ऑक्टोबर 2023 एकूण निर्णय -7

Tue Oct 10 , 2023
महिला व बालविकास विभाग राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 मुलींना करणार लखपतीhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com