संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रज्ञा शिल बौद्ध विहार खसाळा ता. कामठी जि. नागपूर द्वारा आयोजित बौद्ध धम्म संस्कार शिबिर शनिवार दि. ०७.०९.२०२४ रोजी संपन्न झाले त्या शिबिराला पिरिपा चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे सांगितले की बौद्ध विहार हे धम्म संस्काराचे केन्द्र आहे. ज्या प्रमाणे आपले प्रथम गुरू हे आपले आईवडील आहेत त्याच प्रमाणे धम्माचे संस्कार हे बौद्ध विहारातुन होत असतात. आपण जर धम्मा नुसार आचरण केले तर आपला विकास होत असतो. आपल्या ला स्वतः चा व समाजाचा विकास करावयाचा असेल तर आपण नियमितपणे दर रविवारी बौद्ध विहारात येवून धम्म समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्या नुसार आचरण करून मानवी विकास साधता येईल. आपण व आपली पिढी संस्कार मय घडविण्यासाठी तयार करु शकतो. बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार जग भर राजा अशोकाने केलेला आहे आपण सुद्धा धम्मा नुसार आचरण करून प्रसार व प्रचार करावा. असे आवाहन धम्म संस्कार शिबिरात केले.
धम्म संस्कार शिबिराला प्रामुख्याने आदरणीय भन्ते नाग दिंपकर महाथेरो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर संबोधतात असे सांगितले की आपण आपल्या दैनंदिन जीवनात धम्मा नुसार आचरण केल्यास आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. पुढील पिढी ही धम्मा नुसार आचरण करणारी हवी असेल तर बौद्ध विहारात धम्म संस्कार शिबिर घेणे आवश्यक आहे असे सांगितले.
विजय पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मजदूर सेना, कैलास बांम्बोर्डे अध्यक्ष पिरिपा नागपूर ग्रामीण यांनी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
प्रज्ञा शिल बौद्ध विहारा तर्फे कवाडे यांचे स्वागत बौद्ध विहाराचे अध्यक्ष सुनील शंभरकर यांनी केले.
बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे संचालन व प्रास्ताविक बंडु शंभरकर सचिव प्रज्ञा शिल बौद्ध विहार यांनी केले.
या शिबिराला प्रामुख्याने प्रमोद कुंभारे, दिवाकर सोनटक्के, सुभाष नारनवरे सुनिल शंभरकर देवचंद तभाने शे़न्डे , सावित्रीबाई महिला मंडळाच्या पदाधिकारी अंजिरा फुलझेले, अर्चना सुनिल शंभरकर, यशोधरा फुलझेले, सुनिता कापसे, भावना शंभरकर, मंगला ताई फुलझेले वंदना सोनटक्के, कल्पना सोनडवले प्रमिला फुलझेले संगिता मेश्राम यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत केली.