फसवणूक झालेल्या वृद्ध शेतकरी महिलेला जमीन परत मिळवुन देण्यात प्रा अवंतिका लेकुरवाडे ची भूमिका मोलाची

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भामेवाडा गावातील वृद्ध शेतकरी महिलेच्या 5 एकर जमिनीचा सौदा 1 कोटी रुपयाच्या घरात करून करारनामा च्या नावावर पॉवर ऑफ अटरणी करून ठरलेल्या खरेदी विक्री नुसार 95 लक्ष रुपयेचे चेक बाउन्स करून तीच शेती पॉवर ऑफ अटरणीच्या नावावर इतर तिसऱ्या व्यक्तीला विक्री केल्याचा प्रकार मोटघरे नामक व्यक्तीने केला होता तर दुसरीकडे मूळ शेतमालक सदर वृद्ध महिलेला जमिनीचे पैसे न देता ती जमीन विक्री केल्याचा बनाव करून फसगत केली अश्या परिस्थितीत प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी पुढाकार घेऊन फसगत झालेल्या या पीडित महिलेला शेतजमीन परत मिळवून दिल्याची मोलाची भूमिका साकारली.

प्राप्त माहितीनुसार भामेवाडा रहिवासी मीरा घनश्याम वासनिक वय 60 वर्षे यांना एकुलता एक विवाहित मुलगा असून 5 एकर शेती आहे या शेतीत उसाची पेरणी केली जाते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी मोटघरे नामक व्यक्तीने सदर वृद्ध महिलेशी भेट घालून तिच्या अशिक्षितपणा चा फायदा घेत तिची जमीन विकत घेत असल्याचे बतावणी करून 95 लक्ष रूपयात सौदा करून ऍग्रिमेंट च्या नावावर मोटघरे नामक व्यक्तीने नागपूर ला पॉवर ऑफ अटरणी करून घेतले व विविध बँकेच्या नावाने 14 लक्ष,20 लक्ष रुपये अशा विविध किमतीचे चेंक दिले व ती जमीन पॉवर ऑफ अटरणीच्या नावावर फलके नामक व्यक्तीशी विक्री चा सौदा केला.मात्र या प्रकारात सदर वृद्ध महिलेची जमिनीचे मूळ रक्कम न देता ऍग्रिमेंटच्या नावावर पॉवर ऑफ अटरणी करून फसगत केल्याचा प्रकार उघडकीस येताच पीडित शेतकरी महिला मीराबाई वासनिक व मुलगा अरविंदला एकच धक्का बसला.यांनी त्वरित जिल्हा परिषद नागपूर चे महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे यांच्याशी संपर्क साधले असता प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी त्वरित ही बाब गांभीर्याने लक्षात घेत त्वरित या प्रकरणात सदर वृद्ध महिलेच्या पाठीशी उभे राहून त्या संदर्भात पाठपुरावा केला असता मुख्य फसवणूक दार मोटघरे नामक व्यक्ती पसार झाल्याचे निष्पन्न झाले तर तीच जमीन मोटघरे ने ज्या फलके नामक व्यक्तिला विकले होते त्या व्यक्तीशी संपर्क साधून तयाच्याकडून ती जमीन परत घेत कामठी च्या तहसील कार्यालयातून फसवणूक झालेली जमिनीचा परत रजिस्टर करून मूळ मालक मीराबाई वासनिकच्या नावे करून फसवणूक झालेली जमीन परत मिळवण्यात यश लाभले.मात्र प्रकरण इथेच थांबत नाही तर या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या मोटघरे वर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे लेकुरवाडे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

होय.. ‘कलंक’ च... ‘रोक सको तो रोक लो’, म्हणत ठाकरेंचे सैनिक उतरणार रस्त्यावर !

Wed Jul 12 , 2023
– हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा -प्रकाश जाधव  नागपुर :- उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळणाऱ्या भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आज (ता. १२) बुधवारी दुपारी तीन वाजता व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा, असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी गृहमंत्र्यांना दिला. उद्धव ठाकरे यांचे विमानतळावरचे फलक फाडणाऱ्या तसेच त्यावर काळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com